Posts

पाण्याचे दुर्भिक्ष अन् आठवण...

कालच्या बातम्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ऐकले. सध्या फार मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. पाण्याचा साठा पंचवीस टक्क्यांपर्यंत आलेला.         आणि सहज आठवले आपलं बालपण... बालपणी ओढा बारामाही वाहायचा. त्या पाण्यातून जाता येता आनंद वाटायचा. ओढ्याचे पाण्याने पायाला गुदगुल्या केल्यासारखं वाटायचं. ते पाणी नितळ असायचं. खोलपर्यंत सर्व काही नजरेत भरायचे...   नदी तुडुंब भरून वाहत असायची. भर उन्हाळ्यात "नंदीमोड" या खोलगट पाण्यात पोहताना मजा यायची. थंडी लागली की गरमागरम वाळू...मग त्यावर लोळायचं..आनंद घ्यायचा...पुन्हा पाण्यात पोहायचं...असा क्रम असायचा...   तहान लागली की "गु़ंडगा" मधील वाहतं पाणी जनावरासारखं तर कधी ओंजळीने प्यायचे.  गुंडगा म्हणजे ओढ्याच्या काठी तसेच नदीच्या काठी खोलगट खड्डा असायचा. त्यामध्ये एकदम स्वच्छ पाणी जमा व्हायचे...ते आजचे फिल्टर पाणी..आणि आज आपण तसे पाणी बंद बाटलीतून घेतोय...   १९८९ ला स्वामी विवेकानंद महाविद्यालयात रूजू झालो. त्याचं वर्षी अकरावीला भास्कर चंदनशिव यांचा पाणी हा पाठ शिकवत होतो. ग्रामीण भागातील पाणी...ओढे..नदी.. स्वच्छ पाणी पि...
            पोपटरावची मुंबई वारी.    गावात दसऱ्याच्या आगमनाची धावपळ सुरू झालेली. शेतात कामाची घाई चालली होती. हलका पाऊस पडून गेलेला. तो "सडाका" उगीच रुबाब दाखवतोय. अजूनही ढगाळ असे वातावरण होते. त्यातून सूर्य डोकावून पाहत होता. गावातही मोठी लगबग सुरू झालेली. पोपटराव मात्र आपल्याच तंद्रित मारुतीच्या पारावर एक टक लावून बसलेला. त्याच्या त्या नजरेसमोरून त्याचे " ते" जीवन धावत असावे!.इतका तो मग्न झालेला. तितक्यात एक वाहन अतिवेगाने येऊन मंदिराजवळ थांबले. त्या आवाजाने पोपटराव खडबडून जागे झाले. पाहतात, तर गाडीतून गावातीलच असलेला चालक उतरला. तो तरुण, तडफदार होता. त्याच्या त्या वयाप्रमाणे त्याची गाडी धावते आहे. त्याच्याकडे पाहत पोपटराव म्हणाले, " ये अंदा, कोणाची गाडी हाय रे?. " नाना, त्रंबकराव अण्णाची हाय". " कधी घेतले रे त्र्यंबकन". " परवा म्हणजे एक वरीस होते बघा आता दिवाळीला". " बरं बरं". पोपटरावचे बोलणं थोडं तिरकस असायचं पण आज खूप छान बोलले याचा आनंद अंदाला झालेला. अंदा घाईघाईने प्रल्हाद कारभारीकडे गेला. त्यांचा चिरेबंदीवाड...

मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान.

              मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान...    भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवस अधिकचा लढा देत हैदराबाद संस्थान संपविले. आणि संस्थानातील जनता मुक्त झाली. १७ सप्टेंबर १९४८ हा हैदराबाद संस्थानातील जनतेचा स्वातंत्र्य दिन ठरला. हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून, शौर्यातून प्राप्त झाले.जनता लढा उभारते आणि विजय मिळविते हे या लढ्याने सिद्ध झाले...     हैदराबाद संस्थानाविरुद्ध लढताना अनेक महिला आघाडीवर होत्या. निजामी अत्याचारला कंटाळून शेकडो महिला या लढ्यात सहभागी झाल्या होत्या.   आ.कृ.वाघमारे यांच्या पत्नी आशाताई या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू लागल्या. वाघमारे हे वृतपत्रीय लेखन करू लागले. तर त्यांच्या पत्नी आशाबाई या शाळेतील व कॉलेजातील तरुण विद्यार्थ्यांच्या मनात तसेच  दारोदार फिरून लोकांच्याही मनात चळवळीचे बीज रुजू लागल्या. प्रशिक्षणाचे धडे देऊ लागल्या. रझाकारांना कसे तोंड द्यायचे,त्यांच्यावर कसे हल्ले करायचे,...