पोपटरावची मुंबई वारी. गावात दसऱ्याच्या आगमनाची धावपळ सुरू झालेली. शेतात कामाची घाई चालली होती. हलका पाऊस पडून गेलेला. तो "सडाका" उगीच रुबाब दाखवतोय. अजूनही ढगाळ असे वातावरण होते. त्यातून सूर्य डोकावून पाहत होता. गावातही मोठी लगबग सुरू झालेली. पोपटराव मात्र आपल्याच तंद्रित मारुतीच्या पारावर एक टक लावून बसलेला. त्याच्या त्या नजरेसमोरून त्याचे " ते" जीवन धावत असावे!.इतका तो मग्न झालेला. तितक्यात एक वाहन अतिवेगाने येऊन मंदिराजवळ थांबले. त्या आवाजाने पोपटराव खडबडून जागे झाले. पाहतात, तर गाडीतून गावातीलच असलेला चालक उतरला. तो तरुण, तडफदार होता. त्याच्या त्या वयाप्रमाणे त्याची गाडी धावते आहे. त्याच्याकडे पाहत पोपटराव म्हणाले, " ये अंदा, कोणाची गाडी हाय रे?. " नाना, त्रंबकराव अण्णाची हाय". " कधी घेतले रे त्र्यंबकन". " परवा म्हणजे एक वरीस होते बघा आता दिवाळीला". " बरं बरं". पोपटरावचे बोलणं थोडं तिरकस असायचं पण आज खूप छान बोलले याचा आनंद अंदाला झालेला. अंदा घाईघाईने प्रल्हाद कारभारीकडे गेला. त्यांचा चिरेबंदीवाड...
Posts
Showing posts from October, 2023